अँडी मरे

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

अँडी मरे

अँड्र्यू अँडी मरे ( मे १५, इ.स. १९८७, ग्लासगो, स्कॉटलॅंड) हा एक ब्रिटिश टेनिस खेळाडू आहे. तो ब्रिटनमधील सर्वोत्तम टेनिस खेळाडू असून सध्या ए.टी.पी.च्या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आजवर ८ एटीपी मास्टर्स स्पर्धा जिंकल्या असून ३ वेळा ग्रँड स्लॅम स्पर्धांचे विजेतेपद मिळवले आहे. एकाच वर्षात चारही ग्रँड स्लॅम स्पर्धांच्या अंतिम फेऱ्या गाठणारा खुल्या जगतातील केवळ सातवा टेनिस खेळाडू तर विंबल्डनची अंतिम फेरी गाठणारा एकमेव ब्रिटिश खेळाडू आहे. २०१२ यू.एस. ओपन स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवून मरे ७६ वर्षांमध्ये ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणारा पहिलाच ब्रिटिश टेनिस खेळाडू ठरला. ह्यापूर्वी फ्रेड पेरी ह्याने १९३६ साली यू.एस. ओपन स्पर्धा जिंकली होती. ह्यापूर्वी चार ग्रँड स्लॅम स्पर्धांच्या अंतिम फेरीत पराभव पत्कारणाऱ्या मरेला पाचव्या वेळेस मात्र स्पर्धा जिंकण्यात यश मिळाले. २०१३ विंबल्डन स्पर्धा जिंकून मरे ७७ वर्षांनंतर हा मान मिळवणारा पहिला ब्रिटिश टेनिस खेळाडू बनला.

२०१२ लंडन ऑलिंपिक स्पर्धेत मरेने रॉजर फेडररला हरवून पुरूष एकेरीमध्ये सुवर्णपदक तर मिश्र दुहेरीमध्ये रौप्य पदक पटकावले. त्याने २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये पुन्हा पुरुष एकेरीचे सुवर्णपदक मिळवले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →