अँडी रॉडिक

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

अँडी रॉडिक

अँड्र्यू स्टीवन रॉडिक (इंग्लिश: Andrew Stephen "Andy" Roddick; ३० ऑगस्ट १९८२) हा एक निवृत्त अमेरिकन टेनिस खेळाडू आहे. ए.टी.पी. जागतिक क्रमवारीमध्ये काही काळ अव्वल क्रमांकावर असलेल्या रॉडिकने २००३ यू.एस. ओपन स्पर्धेमध्ये अजिंक्यपद मिळवले होते. ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या एकेरीमध्ये विजय मिळवणारा तो अखेरचा अमेरिकन टेनिस खेळाडू आहे. ह्या व्यतिरिक्त रॉडिकने इतर चार ग्रँड स्लॅम स्पर्धांच्या अंतिम फेऱ्या गाठल्या परंतु ह्या चारही अंतिम सामन्यांमध्ये त्याला रॉजर फेडररकडून हार पत्करावी लागली.

२०१२ यू.एस. ओपन स्पर्धेदरम्यान रॉडिकने निवृत्ती जाहीर केली. ब्रूकलिन डेकर ही अमेरिकन मॉडेल त्याची पत्नी आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →