मार्टिना हिंगीस (जर्मन: Martina Hingis) ही स्वित्झर्लंड देशाची एक निवृत्त टेनिसपटू आहे. आपल्या कारकिर्दीत हिंगीसने ५ एकेरी, ९ महिला दुहेरी व १ मिश्र दुहेरी ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या. डब्ल्यूटीएच्या जागतिक क्रमवारीत हिंगीस २०९ आठवडे अव्वल स्थानावर होती.
१५ वर्षे ९ महिने वयाची असताना हिंगीसने १९९६ सालच्या विंबल्डन स्पर्धेत महिला दुहेरीचे अजिंक्यपद मिळवले. ग्रँड स्लॅम जिंकणारी ती सर्वात तरुण टेनिस खेळाडू होती. त्यानंतर झपाट्याने नवे विक्रम स्थापित करणारी हिंगीस २००२ च्या अखेरीस दुखापतग्रस्त झाली व तिने तब्बल ४ वर्षांनंतर पुनःपदार्पण केले. २००७ मधील विंबल्डन स्पर्धेदरम्यान हिंगीसने कोकेन ह्या अंमली पदार्थाचे सेवन केल्याचे आठळून आले व तिच्यावर व्यावसायिक टेनिस खेळण्यापासून बंदी घालण्यात आली.
मार्टिना हिंगीस
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?