२०१६ फ्रेंच ओपन ही फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची ११५वी आवृत्ती होती. ही स्पर्धा २२ मे ते ५ जून, इ.स. २०१६ दरम्यान पॅरिस येथे भरवण्यात आली. स्वित्झर्लंडचा स्तानिस्लास वावरिंका हा पुरुष एकेरीमधील गतविजेता तर अमेरिकेची सेरेना विल्यम्स महिला एकेरीतील गतविजेती आहेत. गुढघा दुखापतीमुळे रॉजर फेडररने स्पर्धेत सहभाग घेतला नाही तर ९ वेळच्या विजेत्या रफायेल नदालला मनगट दुखापतीमुळे तिसऱ्या फेरीमध्ये माघार घ्यावी लागली.
सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने पुरूष एकेरीमध्ये अजिंक्यपद मिळवून आपले ग्रँड स्लॅम पूर्ण करण्याचे स्वप्न साकारले. सलग चार ग्रँड स्लॅम स्पर्ध जिंकण्याचा पराक्रम करणारा जोकोविच हा १९६९ सालापासून रॉड लेव्हरनंतर दुसराच टेनिस खेळाडू आहे. महिला एकेरीमध्ये स्पेनच्या गार्बीन्या मुगुरूझा आपले पहिलेच ग्रँड स्लँम विजेतेपद मिळवले.
२०१६ फ्रेंच ओपन
थोडक्यात पण महत्त्वाचे.