सेरेना विल्यम्स (इंग्लिश: Serena Jameka Williams) ही एक अमेरिकन टेनिसपटू आहे. सेरेनाने आजवर एकूण ३८ ग्रँड स्लॅम (२२ एकेरी, १४ दुहेरी व २ मिश्र दुहेरी) जिंकल्या आहेत. सध्या डब्ल्यूटीए यादीत अव्वल क्रमांकावर असलेली सेरेना आजवर ५ वेळा व एकूण १२३ आठवडे अव्वल स्थानावर राहिली आहे. सेरेनाने अमेरिकेसाठी ऑलिंपिक महिला दुहेरी टेनिसमध्ये दोन वेळा (२०००, २००८) सुवर्ण पदके मिलवली आहेत. सेरेना महिला टेनिस जगताच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ खेळाडूंपैकी एक मानली जाते.
सर्वाधिक एकेरी ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये विजय मिळवणारी सेरेनाने ह्या बाबतीत स्टेफी ग्राफची बरोबरी साधली आहे. मोठी बहीण व्हीनस विल्यम्स हीच सेरेनाची दुहेरीमध्ये जोडीदार राहिली आहे. दोघींनी १४ दुहेरी ग्रँड स्लॅम जिंकल्या आहेत. व्हीनससोबत सेरेनाची एकेरीमधील प्रतिस्पर्धा देखील विक्रमीच आहे. ह्या दोघी २३ वेळा एकेरी सामन्यांमध्ये भेटल्या असून सेरेनाने १३ सामने जिंकले आहेत.
सेरेना विल्यम्स
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.