कालापाणी प्रदेश

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

कालापाणी प्रदेश

कालापाणी प्रदेश हे भारताच्या उत्तराखंड राज्यातील पिथोरागढ जिल्ह्यातील पूर्वोत्तर तिबेट आणि नेपाळच्या सीमेवरील उत्तरेकडील हिमालयातील एक भाग आहे. हा प्रदेश हिमालयात समुद्र पातळी पासून ६१८० मीटर उंचीवर आहे. परंतु नेपाळने १९९८ पासून या क्षेत्राचा दावा केला आहे. नेपाळच्या दाव्यानुसार हा भाग सुदूरपश्चिम प्रदेशच्या दार्चुला जिल्ह्यात आहे.. हे प्रदेश कालापाणी नदीचे खोरे आहे. ही नदी काली नदीची हिमालयातील समुद्रपातळी पासून ३६००-५२०० मीटर उंची वर एक उपनदी आहे. कलापिनी आणि लिपुलेख खिंड, हा भारतापासून कैलास - मानसरोवर या प्राचीन तीर्थस्थळाला जाण्याचा एक मार्ग आहे. हा उत्तराखंड प्रांतातील टिंकर खोऱ्यातील भोतिया लोकांसाठी तिबेटला जोडणारा पारंपारिक व्यापार मार्ग देखील आहे.

या प्रदेशात काली नदी भारत आणि नेपाळ दरम्यानची सीमा बनवते. तथापि, भारत असे सांगते की नदीच्या उगम हद्दीत समाविष्ट केलेले नाही. येथे सीमा पाणलोटा बाजूने धावते. ही स्थिती ब्रिटिश भारता पासून आहे (इ.स.१८६५) .

या प्रदेशच्या परिसराजवळ नेपाळ मध्ये टिनकर पास (किंवा "टिंकर लिपू") नावाची आणखी एक खिंड आहे. १९६२ च्या चीन-भारतीय युद्धानंतर भारताने लिपुलेख पास बंद केल्यानंतर भोटिया व्यापार बहुतेक टिंकर खिंडीतून जात असे. १९९७ मध्ये भारत आणि चीनने लिपुलेख खिंडाला पुन्हा उघडण्यास सहमती दर्शविल्यानंतर, कलापाणी प्रदेशाबद्दल नेपाळी निषेध सुरू झाला.

भारतीय आणि नेपाळच्या अधिकाऱ्यांची संयुक्त तांत्रिक समिती १९९८ पासून सीमेच्या इतर मुद्द्यांसह या विषयावर चर्चा करीत आहे. परंतु अद्याप हे प्रकरण सोडविले नाही.२० मे २०२० रोजी नेपाळने स्वत: च्या हद्दीचा नवीन नकाशा प्रसिद्ध केला ज्यात पहिल्यांदाच कलापाणी, लिपुलेख आणि लिंपियाधुरासह कुटी यंगती नदी पर्यंतची सर्व जमीन नेपाळचा भाग म्हणून दाखविण्यात आली. नेपाळच्या दार्चुला जिल्ह्याचा भाग म्हणून नेपाळचे नकाशे हे क्षेत्र दर्शवितात, हे क्षेत्र ३५ चौरस किलोमीटर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →