२०२३ नेपाळ तिरंगी मालिका ही एक ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा होती, जी ऑक्टोबर २०२३ मध्ये नेपाळ येथे झाली. नेपाळ, हाँगकाँग आणि संयुक्त अरब अमिराती हे सहभागी संघ होते. ही स्पर्धा आशिया विश्वचषक पात्रता स्पर्धेच्या तीनही संघांच्या तयारीचा भाग होती.
ही स्पर्धा दुहेरी राऊंड-रॉबिन स्वरूपात खेळली गेली, त्यानंतर आघाडीच्या दोन संघामध्ये अंतिम सामना खेळला गेला. गट सामने कागेश्वरी-मनोहरा येथील मुलपाणी क्रिकेट स्टेडियमवर खेळले गेले आणि अंतिम सामना कीर्तिपूर येथील त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर खेळला गेला.
यूएईने फायनलमध्ये नेपाळचा ६ गडी राखून पराभव केला. नेपाळच्या करण केसीला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.
२०२३ नेपाळ टी२० आंतरराष्ट्रीय तिरंगी मालिका
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.