काराकुरी कठपुतळी (からくり人形) ही पारंपारिक जपानी यांत्रिक कठपुतळी किंवा ऑटोमॅटा आहे. या कठपुतळ्या १७ व्या शतकापासून १९ व्या शतकापर्यंत बनविलेल्या जायच्या. बाहुल्यांचे हावभाव बघणे हा एक प्रकारच्या मनोरंजनाचा भाग होता. कराकुरी या शब्दाचा अर्थ जपानी भाषेत "यंत्रणा" किंवा "युक्ती" असा देखील आहे. हे कोणत्याही उपकरणाचे वर्णन करण्यासाठी वापरले जाते जे त्याच्या अंतर्गत कार्य लपवून विस्मय निर्माण करते.
काराकुरी हे नाव जपानी क्रियापद काराकुरु या शब्दापासून आले आहे असे मानले जाते. ज्याचा अर्थ 'ताणणे आणि धागा हलवणे' असा होतो. वैकल्पिकरित्या कांजी भाषेत त्याला 機巧 ' दांग ' आणि प्राचीन भाषेत ' दांगू ' म्हणून लिहिले जाते.
काराकुरी कठपुतळी
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!