बाहुली ही मनुष्याची छोट्या रूपातील प्रतिमा किंवा वस्तू होय. बाहुली ही खेळणे म्हणून जास्त वापरली जाते. तसेच जादूटोणासारख्या प्रथा आणि धार्मिक विधीमध्ये मूर्ती म्हणून वापरली जाते. बाहुलीचा वापर सिंधू, जपानी, ग्रीक, इजिप्त, आफ्रिका इ. संस्कृतींत खूप प्राचीन काळापासून केला गेला आहे. रुथ हॅंडलर यांने बार्बी या बाहुलीची निर्मिती १९५९ साली केली, जी व्यापारीदृष्ट्या सर्वात जास्त यशस्वी ठरली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बाहुली
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.