कामाख्या मंदिर हे आसामची राजधानी गुवाहाटी (गोहत्ती)येथे आहे. शक्तिदेवता सतीचे हे मंदिर आसामची राजधानी दिसपूर येथून ६ कि.मी. अंतरावर असलेल्या नीलांचल पर्वतश्रेणीत आहे.हे देवीच्या ५१ शक्तिपीठांपैकी एक असून येथील देवी योनी स्वरूपात आहे. हे ठिकाण तांत्रिक सिद्धीचे सर्वोच्च सिद्ध शक्तिपीठ आहे. या भागाला मध्यांचल पर्वत या नावानेही ओळखले जाते, कारण या ठिकाणी समाधिस्थितीत असलेल्या शंकराला कामदेवाने बाण मारला होता आणि समाधीतून बाहेर आल्यावर शंकराने त्या कामदेवाला जाळले होते. नीलाचल पर्वतावर कामदेवाला पुनः जीवनदान मिळाले म्हणून या क्षेत्राला कामरूप असेही म्हणले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कामाख्या मंदिर
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.