पाटणादेवी

थोडक्यात पण महत्त्वाचे.

पाटणादेवी मंदिर हे महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव तालुक्यातील आदिशक्ती चंडिकादेवीचे एक पवित्र मंदिर आहे. चाळीसगाव शहरापासून अवघ्या १८ किमी अंतरावर नैर्ऋत्येला असणारे हे शक्तीपीठ गौताळा औटमघाट अभयारण्याच्या कुशीत वसलेले आहे. वर्षभर येथे भक्तांचा राबता असला तरी नवरात्रीच्या पर्वणीवर अलोट गर्दी होते. निसर्गाच्या सान्निध्यात आदिशक्तीचा जागर मनात साठवण्यासाठी परराज्यांतूनही भाविक येथे आवर्जून हजेरी लावतात.

मध्य रेल्वेच्या मुंबई-नाशिकरोड-भुसावळ मार्गावर मनमाडनंतर चाळीसगाव हे रेल्वे स्थानक येते. चाळीसगाव एसटी बस स्थानकावरून सकाळी साडेसातपासून दर तासाला पाटणादेवीसाठी बस उपलब्ध असतात. चाळीसगाव ते पाटणादेवी हे अंतर १८ किलोमीटर आहे. पाटणादेवीच्या या मंदिरात आदिशक्ती चंडिकादेवीची मूर्ती आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →