कागद हे लिहिण्यास, छपाईस वा वेष्टणासाठी (पॅकेजिंगसाठी) वापरले जाणारे एक पातळ साहित्य आहे. लाकूड, बांबू, चिंध्या, गवत इत्यादीचे ओले सेल्युलोजच्या लगद्याचे तंतू विशिष्टरित्या दाबून नंतर वाळवले की कागद तयार होतो. कागद हा माहिती साठवण्यासाठी गरजेचा आहे .
कागदाला घड्या घालून त्याचे लिफाफे, खेळणी आदी वस्तू बनतात. रंगीत कागदांचे पतंग, पताका, झिरमिळ्या, पिशवी, भिरभिरे आदी वस्तू होतात.
हात, पाय, तोंड, फर्निचर वगैरे पुसून कोरडे करण्यासाठी कागद वापरला जातो. अनेक औद्योगिक तसेच बांधकाम क्रियांमध्येही याचा वापर होतो. क्वचितच, खाद्य कागद म्हणूनही याचा वापर होतो.
कागदाची निर्मिती ही झाडापासून होते. म्हणून आपण झाडे लावावीत आणि कागदाचाही कमीतकमी वापर करावा.
कागद
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?