पुस्तक हे लिखित, छापलेल्या व कोऱ्या कागदापासून व चर्मपत्रे, झाडाच्या पानांपासून किंवा इतर कोणत्याही साहित्यापासून बनविलेल्या पानांचे एकत्रित संकलन असते. त्याच्या एका बाजूस बिजागऱ्यागत सांधा असतो. पुस्तकाच्या एका कागदाला पान म्हणतात. तर त्या पानाच्या पुढच्या बाजूस मुखपृष्ठ असे म्हणतात. इलेक्टॉनिक स्वरूपातल्या पुस्तकास ई-पुस्तक म्हणतात. इजिप्त मध्ये अलेक्झांड्रिया येथे जगातील सर्वात मोठे
ग्रंथालय आहे.
साहित्यिक लिखित व प्रकाशित कृतीस पुस्तक म्हणतात. ग्रंथपालन व माहिती विज्ञानात पुस्तकास मासिके, वर्तमानपत्रे, नियतकालिके यांपासून वेगळे करण्यासाठी 'मोनोग्राफ' म्हणण्यात येते. पुस्तकांसह सर्व लिखित स्वरूपात असलेल्या कामांना साहित्य म्हणतात. मोठ्या कादंबऱ्यांमध्ये पुस्तकाचे अनेक भाग पाडण्यात येतात. (त्यांना प्रकरण-१,प्रकरण-२,प्रकरण-३ अशी, भाग-१, भाग-२, भाग-३ अशी किंवा खंड १, २, ३ अशी नावे देण्यात येतात.) पुस्तकांवर अतिप्रेम करणाऱ्यास पुस्तकी किडा असे म्हणतात. जेथे पुस्तके विकत मिळतात त्या जागेला पुस्तकाचे दुकान म्हणतात. पुस्तके [[ग्रंथालय| माणसांचे राहणीमान सुधारते. पुस्तक हा मानवाला शिकवणारा गुरू आहे. याला कशाचीही मर्यादा नाही. आपण कोणत्याही ठिकाणी बसून ज्ञान घेऊ शकतो. पुस्तक माणसाला ज्ञानी बनवते. पुस्तक म्हणजे केवळ कागदांचा संग्रह नव्हे. पुस्तकं असतात आपला इतिहास आणि भविष्य सुद्धा. पुस्तकं माणसाला समृद्ध बनवितात. आपला विकास करतात, आपल्याला अनुभव देतात. पुस्तके आपली सोबती असतात. पुस्तकांच्या माध्यमातून आपल्याला विविध विषयांची माहिती प्राप्त होते.
पुस्तक
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.