वशी

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

वशी

वशी (和紙) हा पारंपारिक जपानी कागद आहे. हा शब्द कागदाचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो जो स्थानिक तंतु (फायबर) वापरून बनवला जातो. यावर हाताने प्रक्रिया केली जाते आणि पारंपारिक पद्धतीने बनतो. वशी हे गॅम्पीच्या झाडाच्या आतील साल, मित्सुमाता झुडूप (एजवर्थिया क्रायसंथा) किंवा कागदी तुती (कोझो) बुश यापासून तंतू वापरून बनवले जाते. जपानी हस्तकला म्हणून, ते युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून नोंदणीकृत आहे.

लाकडाच्या लगद्यापासून बनवलेल्या सामान्य कागदापेक्षा वशी कागद साधारणपणे कठीण असतो. हा कागद अनेक पारंपारिक कलांमध्ये वापरला जातो. ओरिगामी, शोडो आणि उकिओ-ई हे सर्व वशी वापरून तयार केले जातात. कपडे, घरगुती वस्तू आणि खेळणी, तसेच शिंटो पुजारी आणि बुद्धाच्या मूर्तींसाठी वस्त्रे आणि धार्मिक विधींच्या वस्तू बनवण्यासाठी देखील वशी कागदाचा वापर केला जात असे. स.न. १९९८ च्या हिवाळी पॅरालिम्पिकमधील विजेत्यांना पुष्पहार अर्पण करण्यासाठी देखील याचा वापर केला गेला होता. अनेक प्रकारच्या वशी, ज्यांना एकत्रितपणे जपानी टिश्यू म्हणून संबोधले जाते, ते पुस्तकांच्या संवर्धन आणि दुरुस्तीसाठी वापरले जातात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →