कुमिहिमो

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

कुमिहिमो

कुमिहिमो (組み紐) ही वेणी आणि दोरी बनवण्याची पारंपारिक जपानी कला आहे. याचा शब्दशः अर्थ "एकत्रित धागे" असा होतो. कुमिहिमो हे धागे, सामान्यत: रेशीम, पारंपारिकरित्या, विशेष यंत्रमाग वापरून एकमेकात गुंफुन बनवले जाते. विशेष यंत्रमागांची नावे मरुडाई (丸台) ("गोल स्टँड") किंवा टाकडाई (高台) (कोडाई म्हणूनही ओळखले जाते) अशी आहेत.

कुमिहिमो विणण्याच्या विविध शैली आहेत. या शैलींमध्ये वेगवेगळ्या प्रकारे वेणीची दोरी तयार केली जाते. अगदी सपाट वेणीपासून ते जवळजवळ संपूर्ण गोलाकार वेणी बनवल्या जातात. कुमिहिमोचा वापर ओबिजीम म्हणून केला जातो, हा किमोनो परिधान करताना पुढच्या बाजूस पट्ट्यासारखा वापरला जातो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →