पंप

थोडक्यात पण महत्त्वाचे.

पंप

पंप एक असे साधन आहे जे यांत्रिक क्रियेद्वारे द्रव ( द्रव किंवा वायू ) किंवा कधीकधी स्लरी ( द्रव आणि सूक्ष्म कणांचे मिश्रण ) एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहचवते. पंपांचे वर्गीकरण प्रामुख्याने तीन प्रकारे केले जाऊ शकते, हे वर्गीकरण द्रव पदार्थ पोहचवण्याच्या पद्धतीनुसार : थेट लिफ्ट, विस्थापन आणि गुरुत्व पंप.

पंप हे ठराविक यंत्रणेद्वारे चालतात (त्यात प्रामुख्याने रेसिप्रोकेटिंग आणि रोटरी, उदा. पिस्टन आणि सिलेंडर), आणि वाहणाऱ्या द्रव पदार्थामधून (गतिशील ऊर्जा ) ऊर्जा घेऊन त्याचा वापर यांत्रिक कार्य करण्यासाठी करतात. पंप हे ऊर्जा स्त्रोतांद्वारे चालतात त्यात प्रामुख्याने मनुष्य कार्य (मॅन्युअल वर्क ), वीज, इंजिन किंवा पवन ऊर्जा हे स्रोत येतात. पंप हे अनेक आकारात येतात , वैद्यकीय अनुप्रयोगांमध्ये सूक्ष्म आकारापासून ते खूप मोठ्या औद्योगिक पंपांपर्यंत.

यांत्रिक पंप विहिरींचे पाणी उपसण्यासाठी, मत्स्यालय फिल्टरिंग /शुद्धीकरण, तलावाचे फिल्टरिंग/शुद्धीकरण आणि वायुवीजन, जल-शीतकरण आणि इंधन इंजेक्शनसाठी कार उद्योगात, तेल आणि नैसर्गिक वायू पंप करण्यासाठी उर्जा उद्योगात किंवा शीतकरण कार्य करण्यासाठी वापरतात. टॉवर्स आणि हीटिंग, वेंटिलेशन आणि वातानुकूलन यंत्रणेचे इतर घटक यामध्येही वापरतात. वैद्यकीय उद्योगात, पंपांचा वापर औषधी विकसित आणि उत्पादनात बायोकेमिकल प्रक्रियेसाठी आणि शरीराच्या अवयवांसाठी कृत्रिम बदली म्हणून केला जातो, विशेषतः कृत्रिम हृदय आणि पेनाइल कृत्रिम अंग .

जेव्हा केसिंगमध्ये फक्त एक फिरणारा इम्पेलर (एक चकती ज्यावर विशिष्ट्य पद्धतीने बसवलेल्या पंखानी द्रवाची ऊर्जा एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात स्थानांतरित होते) असतो असतो, त्याला सिंगल-स्टेज पंप म्हणतात. जेव्हा केसिंगमध्ये दोन किंवा अधिक फिरणारे इंपेलर असतात, तेव्हा त्याला डबल किंवा मल्टी-स्टेज पंप म्हणतात.

जीवशास्त्रात, विविध प्रकारचे रासायनिक आणि बायोमेकेनिकल पंप विकसित झाले आहेत ; बायोमिमिक्री कधीकधी नवीन प्रकारचे यांत्रिक पंप विकसित करण्यासाठी वापरली जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →