आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (आयएसएस) हे अंतराळात बांधले जाणारे संशोधन केंद्र आहे. याचे बांधकाम १९९८ मध्ये चालू झाले.
१९९८ मध्ये अंतराळात पाठवलेले हे स्थानक २०११ पर्यंत पूर्णपणे कार्यान्वित झालेले आहे, ते आतापर्यंत अंतराळात पाठवलेले सर्वांत मोठे स्थानक आहे. ते फुटबॉलच्या मैदानापेक्षाही मोठे आहे. जगभरातील सोळा देशांनी एकत्र येऊन हा प्रकल्प राबविला आहे. अमेरिका, रशिया, जपान, कॅनडा आणि १० युरोपियन देशांचा त्यात प्रत्यक्ष सहभाग आहे.
तासाला २७,७२४ किलोमीटर एवढ्या प्रचंड वेगाने ते पृथ्वीला प्रदक्षिणा घालते; म्हणजे ९१ मिनिटांत एक प्रदक्षिणा पूर्ण होते. हे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सुमारे ३५० कि.मी. उंचीवर आहे. हे स्थानक म्हणजे एक कृत्रिम उपग्रह असून, तो आतापर्यंतच्या कोणत्याही कृत्रिम उपग्रहापेक्षा खूप मोठा आहे. स्थानकाला रशियन ऑर्बिटल सेगमेंट (आरओएस) आणि युनायटेड स्टेट्स ऑर्बिटल सेगमेंट (युएसओएस) अशा दोन भागात विभागण्यात आले आहे. याची लांबी २४० फूट, तर रुंदी ३३६ फूट आहे. यामध्ये सहा व्यक्ती एका वेळेस राहण्याची व्यवस्था आहे. २ नोव्हेंबर २००० पासून या स्थानकात सलग &0000000000000025.000000२५ वर्षे, &0000000000000062.000000६२ दिवस अंतराळवीरांचे वास्तव्य आहे. आयएसएस २०२४ पर्यंत अनुदानित आहे आणि २०२८ पर्यंत कार्यरत राहण्याची शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.