कविता सुब्रमण्यम ऊर्फ कविता कृष्णमूर्ती (तमिळ: கவிதா கிருஷ்ணமுர்த்தி சுப்பிரமணியம் ; रोमन लिपी: Kavita Krishnamurthy Subramaniam ;) (जानेवारी २५, इ.स. १९५८ - हयात) या भारतीय चित्रपटांतील पार्श्वगायिका आहेत. विवाहानंतर त्या हिंदी बॉलीवूड गाण्याबरोबरच इंडिपॉप गाणी, (उडत्या चालीची हिंदी गाणीही गाऊ लागल्या आहेत.
कविता कृष्णमूर्ती या दिल्लीत राहत होत्या आणि वयाच्या १४व्या वर्षी मुंबईला आपल्या बंगाली मावशीकडे आल्या. त्यांना पार्श्वगायिका बनवण्याची मावशीचीच खूप इच्छा होती.
कविता कृष्णमूर्ती यांनी लक्ष्मीकांत-प्यारेलाल, खय्याम, राहुल देव बर्मन, ए. आर. रहमान, जतीन ललित, रवींद्र जैन यांसारख्या ज्येष्ठ संगीतकारांबरोबर काम केले, इतकेच नाही तर त्यांना मन्ना डे, हेमंतकुमार, मुकेश, लतादीदी यांसारख्या ज्येष्ठ गायकांबरोबर गाण्याची संधी मिळाली.
कविता कृष्णमूर्ती
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.