कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

संस्कृत भाषेच्या अभ्यासासाठी महाराष्ट्रात कोणतेही विद्यापीठ नव्हते. हे लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने दिनांक



१८ सप्टेंबर, इ.स. १९९७ रोजी नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे या विद्यापीठाची स्थापना केली.

संस्कृतमधील थोर कवी कालिदास यांचे नाव या विद्यापीठास देण्यात आले.



कवि कालिदासांनी त्यांचे 'मेघदूत' हे काव्य रामटेक येथे लिहिले असल्याचे बोलले जाते, म्हणूनच या विद्यापीठाचे मुख्यालय रामटेक येथे आहे.

ह्या विद्यापीठातर्फ़े संस्कृत साहित्याच्या वेगवेगळ्या विषयांवर अभ्यास आणि अध्यापनाच्या व्यवस्थेसाठी अनेक विभागांतर्गत काम केले जाते. आणि पदविका, स्नातक, स्नातकोत्तर पदवी, विद्यानिष्णात पदव्या प्रदान केल्या जातात.[१]

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →