महाकवी कालिदास हे एक शास्त्रीय संस्कृत लेखक होते, त्यांना भारतीय संस्कृत व प्राकृत भाषेतील महान कवी आणि नाटककार म्हणून ओळखले जाते. त्यांची नाटके आणि कविता प्रामुख्याने वेद, रामायण, महाभारत आणि पुराणांवर आधारित आहेत . कालिदासाच्या सप्त साहित्यात तीन नाटके, दोन खंडकाव्ये आणि दोन महाकाव्यांचा समावेश होतो. त्यांना भारताचा शेक्सपियर म्हणून ओळखले जाणे..ही फक्त अतिशयोक्ती आहे जी काही इतिहासकारांनी चुकीच्या पद्धतीने मांडली. खरं तर महाकवी कालिदास यांची तुलना शेक्स्पिअर सोबत होऊच शकत नाही, एवढे मोठे महाकवि होते कालिदास.
कालिदासाने ‘मालविकाग्निमित्र’ , ‘शाकुंतल’ आणि ‘विक्रमोर्वशीय’ ही ३ नाटके, ‘रघुवंश’, ‘कुमारसंभव’ ही २ महाकाव्ये, आणि ‘मेघदूत’ हे खंडकाव्य; तसेच ‘ऋतुसंहार’ हे निसर्गवर्णनपर काव्य रचले आहे. ह्या ७ रचना खात्रीने त्याच्या नावावर जमा आहेत. इतरही काही सुभाषिते, स्फुटकाव्ये त्याच्या नावावर जमा आहेत; पण ती त्याचीच आहेत, असे खात्रीने अजून तरी सांगता येत नाही.
संस्कृत भाषेमधील महान साहित्यकार महाकवी कुलगुरू कालिदास यांचे साहित्य हजारो वर्षापासून सर्वाना प्रेरणादायी ठरले आहे. महाकवी कालिदास यांच्या साहित्याचा अभ्यास केल्याशिवाय संस्कृत भाषेचा अभ्यास पूर्ण होऊ शकत नाही.संस्कृत भाषेमध्ये त्यांनी अतिउच्च दर्जाचे साहित्य भारतवर्षाला दिलेले आहे.
आषाढ महिन्याचा पहिला दिवस हा महाकवी कालिदासांचा जन्मदिवस म्हणून साजरा होतो. या दिवशी कालिदासप्रेमी नागपूर जवळील रामटेक येथे असलेल्या कालिदासांच्या स्मृतिस्थळाला भेट देतात.
सर्वच सौंदर्यप्रेमी, कलाप्रेमी, कवी, नाटककार, संस्कृत भाषेचेचे विद्यार्थी व अभ्यासक यांना कालिदासांविषयी अतिउच्च प्रेम, आदरभाव आणि त्यांच्या साहित्यनिर्मिती
कालिदास
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.