कल्याण वैद्यनाथन कुट्टूर सुंदरम (११ मे १९०४ - २३ सप्टेंबर १९९२), ज्यांना के.व्ही.के. सुंदरम असेही संबोधले जाते, हे एक भारतीय नागरी सेवक होते, ज्यांनी स्वतंत्र भारताचे पहिले कायदा सचिव (१९४८-५८) आणि भारताचे दुसरे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम केल होत (१९५८ -१९६७). १९६८-७१ या कालावधीसाठी त्यांनी भारताच्या पाचव्या कायदा आयोगाचे अध्यक्षपद भूषवले. ते प्रस्तावाचे प्रमुख लेखक होते ज्याचा उपयोग भारताच्या स्वातंत्र्यानंतर भाषिक रेषेवर तयार केलेल्या राज्यांच्या निर्मितीसाठी मार्गदर्शन ठरला. यासाठी, त्यांना लॉर्ड लुईस माउंटबॅटन यांच्याकडून वैयक्तिक धन्यवाद आणि उच्च प्रशंसा मिळाली.
ते एक संस्कृत विद्वान देखील होते, व त्यांनी संस्कृत लेखक कालिदासाच्या ग्रंथांचे इंग्रजी प्रेक्षकांसाठी भाषांतर केले होते. १९६८ मध्ये भारत सरकारचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण त्यांना मिळाला.
कल्याण सुंदरम
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.