आदित्यनाथ झा (१८ ऑगस्ट १९११ - १९७२) हे नागरी सेवा श्रेणीमध्ये १९७२ मध्ये पद्मविभूषण प्राप्तकर्ते होते. ते भारतीय नागरी सेवाच्या १९३६ च्या बॅचचे होते.
झा हे सर गंगानाथ झा यांचे पुत्र आणि अमरनाथ झा यांचे बंधू होते. त्यांनी अलाहाबाद विद्यापीठात व ऑक्सफर्डच्या जीसस कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेले.
स्वातंत्र्योत्तर, झा यांनी उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव, मसूरी येथील राष्ट्रीय प्रशासन अकादमीचे पहिले संचालक, भारत सरकारचे सचिव आणि दिल्लीचे पहिले लेफ्टनंट गव्हर्नर (उपराज्यपाल) म्हणून काम केले.
नागरी सेवा श्रेणीत १९७२ मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला होता.
आदित्यनाथ झा
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.