कराड

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

कराड

कऱ्हाड हे सातारा जिल्ह्यातील एक तालुक्याचे शहर आहे. यालाच कराड असेही म्हणतात. कृष्णा आणि कोयना या नद्यांच्या संगमावर हे गाव वसले आहे. त्या संगमाला ’प्रीतिसंगम’ असे म्हणतात. या नद्यांचा महाबळेश्वर येथे उगम झाला आहे. महाबळेश्वर कराड पासून १०० कि.मी. अंतरावर स्थित आहे. या नद्या महाबलेश्वर येथे वेगळ्या होतात व पुन्हा कराड येथे एकत्रित होत.कराड पासून सांगली शहर ४५ किलोमीटरवर आहे.कराड मध्ये यशवंतराव चव्हाण यांचे मोलाचे योगदान लाभले आहे.यशवंतराव चव्हाण हे पहिले मुख्यमंत्री कराड गावाचे सुपुत्र आहेत.कराड विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी " कराड समग्र दर्शन" हा विद्याधर गोखले व देशपांडे यांनी लिहिलेले पुस्तक वाचावे. हे पुस्तक म्हणजे कराडचा इतिहास आहे. विद्याधर गोखले हे पु.पां. गोखले म्हणजेच बाबुराव गोखले यांचे चिरंजीव आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →