कनौज लोकसभा मतदारसंघ

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

कनौज लोकसभा मतदारसंघ हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ उत्तर प्रदेश राज्यातील कनौज शहरात स्थित असून येथील तीन विधानसभा मतदारसंघ कनौज जिल्ह्यात, एक मतदारसंघ औरैया जिल्ह्यात तर उर्वरित एक मतदारसंघ कानपूर देहात जिल्हामध्ये आहेत.

प्रसिद्ध भारतीय स्वातंत्र्यसेनानी व चळवळकर्ते राममनोहर लोहिया १९६७ लोकसभा निवडणुकांमध्ये येथूनच निवडून आले होते. त्याचबरोबर दिल्लीच्या दिवंगत मुख्यमंत्री व वरिष्ठ काँग्रेस नेत्या शीला दीक्षित देखील १९८४ मध्ये येथून निवडून आल्या होत्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →