कंबोडिया क्रिकेट संघाचा इंडोनेशिया दौरा, २०२५-२६ हा डिसेंबर २०२५ मध्ये कंबोडिया क्रिकेट संघाने इंडोनेशियाचा केलेला दौरा होता. या दौऱ्यात नऊ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळविण्यात आले. ही मालिका २३ ते २९ डिसेंबर २०२५ दरम्यान बालीमधील जिंबरण येथील उदयाना क्रिकेट मैदानावर खेळविण्यात आली.
इंडोनेशियाने नऊपैकी आठ सामने जिंकून मालिका ८–० ने जिंकली. पाचवा सामना पावसामुळे निकालाविना राहिला. मालिकेतील नवव्या आणि शेवटच्या सामन्यात इंडोनेशियाने कंबोडियाचा ६ गडी राखून पराभव केला.
कंबोडियाच्या शाह अबरार हुसेनने मालिकेत सर्वाधिक २७९ धावा केल्या, तर इंडोनेशियाच्या धर्म केसुमाने १९३ धावा केल्या. गोलंदाजीत इंडोनेशियाच्या एप्रिलियांडी राहायुने सर्वाधिक १२ बळी घेतले, तर कंबोडियाच्या एटिएन ब्यूक्सने ७ बळी घेतले.
कंबोडिया क्रिकेट संघाचा इंडोनेशिया दौरा, २०२५-२६
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?