२०२५ रायझिंग ईस्ट आशिया तिरंगी मालिका (इंग्रजी: 2025 Rising East Asia Tri-Series) ही ६ ते १४ नोव्हेंबर २०२५ दरम्यान बाली, इंडोनेशिया येथे आयोजित करण्यात आलेली आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट स्पर्धा होती. या स्पर्धेत इंडोनेशिया, म्यानमार आणि तिमोर-लेस्ते क्रिकेट संघ यांनी भाग घेतला. सर्व १२ सामने बाली येथील उदयाना क्रिकेट मैदानावर खेळवण्यात आले.
इंडोनेशियाने स्पर्धेतील आपले आठही सामने जिंकून १६ गुणांसह विजेतेपद पटकावले. म्यानमारने आठपैकी चार सामने जिंकून आठ गुणांसह उपविजेतेपद मिळवले, तर तिमोर-लेस्तेला आठही सामन्यांत पराभव पत्करावा लागला. म्यानमारच्या को को लिन थूने १६० धावा करून स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या, तर इंडोनेशियाच्या गेदे आर्ताने आठ बळी घेऊन सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होण्याचा मान मिळवला.
इंडोनेशियाने या स्पर्धेत सहा सामने १० गडी राखून जिंकले, जो एका आंतरराष्ट्रीय टी२० स्पर्धेतील विक्रम ठरला.
२०२५ रायझिंग ईस्ट आशिया तिरंगी मालिका
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.