ओम प्रकाश कोहली

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

ओम प्रकाश कोहली (९ ऑगस्ट, १९३५ - २० फेब्रुवारी, २०२३) हे एक भारतीय राजकारणी होते. हे २०१४ ते २०१९ दरम्यान गुजरातचे राज्यपाल होते ते १९९९-२००० मध्ये भारतीय जनता पक्षाच्या दिल्ली विभागाचे अध्यक्ष होते आणि १९९४ ते २००० पर्यंत त्यांनी राज्यसभेचे सदस्य म्हणून काम केले होते. ते दिल्ली युनिव्हर्सिटी टीचर्स असोसिएशन (DUTA) आणि अभाविप चे अध्यक्ष होते. त्यांनी रामजस स्कूल आणि खालसा स्कूल, नवी दिल्ली येथे शिक्षण घेतले. कोहली हे दिल्ली विद्यापीठातून हिंदीमध्ये मास्टर ऑफ आर्ट्स आणि हंसराज कॉलेज आणि देशबंधू कॉलेजमध्ये ३७ वर्षे व्याख्याता होते. आणीबाणीच्या काळात मिसा अंतर्गत त्यांना अटक करण्यात आली होती.

८ सप्टेंबर २०१६ ते १९ जानेवारी २०१८ दरम्यान पर्यंत त्यांनी गुजरातसह मध्य प्रदेश च्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळला. त्यांना गुजरात आयुर्वेद विद्यापीठ, जामनगरचे कुलपती म्हणूनही नियुक्त करण्यात आले.

साचा:गुजरातचे राज्यपाल

साचा:मध्य प्रदेशचे राज्यपाल

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →