ओखी चक्रीवादळ

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

ओखी चक्रीवादळ

'ओखी चक्रीवादळ' हे सन २०१५ नंतरच्या 'मेघ' या चक्रीवादळानंतर, अरबी समुद्रात उठलेले सर्वात तीव्र उष्ण कटिबंधीय चक्रीवादळ होते.याचा उद्गम हा २९ नोव्हेंबर २०१७चे सुमारास श्रीलंकेपासून झाला.भूमीच्या जवळ असल्याने, याची तीव्रता वाढली नाही.पण त्याचे अरबी समुद्रात आगमन झाल्यावर १ दिसेंबरला ते तीव्र झाले. शीलंकेत जिवीत व वित्त हानी केल्यानंतर ते लक्षद्वीप बेटाकडे व नंतर भारताकडे झेपावले.त्याचे शेवटच्या चरणात,गुजरात हे राज्य याच्या कवेत येण्याची शक्यता आहे.

बांगलादेशने यास ओखी नाव दिले.याचा अर्थ डोळा असा होतो.

या वादळाने सुमारे ३८ बळी घेतलेत त्यासोबतच अनेक मासेमार हे बेपत्ता आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →