ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जून-जुलै १९८७ दरम्यान तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी आयर्लंडचा दौरा केला. ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाचा हा पहिला आयर्लंड दौरा होता. आयर्लंड महिलांनी या मालिकेद्वारे महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले. यजमान आयर्लंडचे नेतृत्व मेरी-पॅट मूरने केले तर ऑस्ट्रेलियाची कर्णधार लीन लार्सेन होती. महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका ऑस्ट्रेलियन महिलांनी ३-० ने जिंकली.
आयर्लंडविरुद्ध मालिका झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन महिला संघ ३ महिला कसोटी आणि ३ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडला रवाना झाला.
ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, १९८७
थोडक्यात पण महत्त्वाचे.