ऑत-दा-फ्रान्स (फ्रेंच: Hauts-de-France उच्चार ) हा फ्रान्स देशाच्या १८ प्रदेशांपैकी एक प्रशासकीय प्रदेश आहे. फ्रान्समधील सर्वात उत्तरेकडील असलेल्या ह्या प्रदेशाच्या उत्तरेस उत्तर समुद्र, पश्चिमेला इंग्लिश खाडी तर ईशान्येस बेल्जियम देश आहेत. २०१६ साली नोर-पा-द-कॅले व पिकार्दी हे दोन प्रदेश एकत्रित करून ऑत-दा-फ्रान्स प्रशासकीय प्रदेशाची निर्मिती करण्यात आली. सुमारे ६० लाख लोकसंख्या असलेला हा प्रदेश घनदाट लोकवस्तीचा प्रदेश आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ऑत-दा-फ्रान्स
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.