अरुणाचलम आर. लक्ष्मणन (२२ मार्च १९४२ - २७ ऑगस्ट २०२०) हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.
त्यांनी चेन्नई येथे शिक्षण घेतले. २००२ मध्ये सर्वोच्च न्यायालयात पदोन्नती होण्यापूर्वी त्यांनी मद्रास उच्च न्यायालय आणि केरळ उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केले. त्यांची २०० मध्ये राजस्थान उच्च न्यायालय आणि २००१ मध्ये हैदराबाद उच्च न्यायालय मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. २००७ मध्ये ते निवृत्त झाले.
२००६-०९ दरम्यान त्यांनी भारतीय कायदा आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम केले.
ऑगस्ट २०२०मध्ये त्याचा कोविड-१९ मुळे मृत्यू झाला. दोन दिवसांपुर्वी त्याच्या पत्नीचा पण मृत्यू झाला होता.
ए.आर. लक्ष्मणन
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.