एस.टी. कामगारांचा संप (२०२१)

थोडक्यात पण महत्त्वाचे.

एस.टी. कामगार संप २०२१ हा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एस.टी.)च्या कर्मचाऱ्यांनी २८ ऑक्टोबर २०२१ रोजी सुरू केलेला संप आहे. महामंडळाचे राज्य सरकारात विलीनीकरण आणि पगारवाढ या प्रमुख कारणांसाठी संप सुरू केला गेला.

२८ ऑक्टोबर २०२१ रोजी संप सुरू झाला असला तरी ९ नोव्हेंबर पासून तो जास्त तीव्र झाला. परिणामतः सरकारी बससेवा ठप्प झाली. कामावर रुजू होण्यास अनेकदा बोलावूनदेखील संपात सहभागी झाल्यामुळे एसटी महामंडळाने आतापर्यंत ११,०२४ कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे. तसेच ३८२६ जणांना बडतर्फ करण्यासाठी कारणे दाखवा नोटीस पाठवली गेली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →