ॲड.गुणरत्न निवृत्तीराव सदावर्ते हे महाराष्ट्रातील विधिज्ञ आहेत. महाराष्ट्र शासनाने २०१८ साली मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास (SEBC) प्रवगातंर्गत आरक्षण दिले होते. मात्र मराठ्यांना दिलेले आरक्षण हे असंवैधानिक असल्याची याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयात यशस्वीपणे लढवली.
ॲडव्होकेट सदावर्ते हे मुळचे नांदेडचे आहेत. त्यांचे शिक्षण छत्रपती संभाजीनगर आणि मुंबईत झाले. ते विविध चळवळींत आधीपासूनच सक्रिय होते. नांदेडला ते 'सम्यक विद्यार्थी आंदोलन'ही त्यांची संघटना चालवायचे आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न हाताळायचे.
काही वर्षांपूर्वी सदावर्ते नांदेडहून येऊन मुंबईत स्थायिक झाले आणि तेथेच ते वकिली करू लागले. वकिलीअगोदर ते शिक्षणाने वैद्यकीय डॉक्टरही झाले होते. त्यांनी भारतीय राज्यघटनेवर पीएच.डी केली आहे. 'मॅट'च्या बार असोसिएशनचे ते दोनदा अध्यक्ष राहिले होते; ते बार काउन्सिलच्या शिखर परिषदेवर होते.
गुणरत्न सदावर्ते
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?