साबानंद मोनप्पा अर्थात एस.एम.पंडित यांचा जन्म गुलबर्ग्यातला. बालवयापासूनच त्यांचा चित्रकलेकडे ओढा होता. त्यांना घरूनही प्रोत्साहन मिळाले. चेन्नई येथून चित्रकलेचा डिप्लोमा मिळ्वून ते पुढील शिक्षणासाठी मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये दाखल झाले. आर्ट स्कूलचे प्रिन्सिपॉल सॉलोमन यांच्या बहुमूल्य मार्गदर्शनाचा लाभ त्यांना झाला आणि ब्रिटिश वास्तववादी चित्रशैलीतील रेखांकन व रेखाटन, मानवाकृतीचे चित्रण व चित्ररचना, तैलरंगाचे रंगलेपन तंत्र, उच्च दर्जाचे व्यक्तिचित्रण अशा विषयांचे ज्ञान त्यांना प्राप्त करता आले. त्यावर पंडित यांनी प्रभुत्व प्राप्त केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →एस.एम. पंडित
या विषयावर तज्ञ बना.