एसबीआय कार्ड

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

एसबीआय कार्ड एंड पेमेंट सर्व्हिसेस लिमिटेड ही कंपनी पूर्वी एसबीआय कार्ड आणि पेमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या नावाने ओळखली जात होती. ही कंपनी भारतात क्रेडिट कार्ड देण्याचे काम करते. एसबीआय कार्ड ऑक्टोबर १९९८ मध्ये सुरू झाली. भारतातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आणि जीई कॅपिटल यांनी मिळून सुरू केली. डिसेंबर २०१७ मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया आणि द कारलाईल ग्रुप या दोघांनी जीई कॅपिटलची हिस्सेदारी वाटून घेतली. एसबीआय कार्डचे मुख्यालय गुडगाव, हरियाणा / दिल्ली एनसीआर येथे आहे. भारतभरातील १०० पेक्षा जास्त शहरांमध्ये याच्या शाखा आहेत. ३१ मार्च २०१६ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात एसबीआय कार्डचा निव्वळ नफा ₹ २७१ कोटी आणि करापूर्वी नफा ₹४३८ कोटी होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →