एरबस सी-२९५ (पूर्वी कासा सी-२९५) हे एक मध्यम पल्याचे रणनीतिक वाहतूक विमान आहे. याची संरचना आणि उत्पादन स्पॅनिश एरोस्पेस कंपनी कासाने केले. ही कंपनी आता एरबस या युरोपियन बहुराष्ट्रीय एरबस संरक्षण आणि अंतराळ विभागाचा भाग आहे.
सी-२९५ चे उत्पादन आणि अंतिम बांधणी दोन्ही सामान्यतः स्पेनमधील सेव्हिया येथील सान पाब्लो विमानतळावरील एरबस संरक्षण आणि अंतराळ विभागाच्या कारखान्यांमध्ये केले जातात. याशिवाय २०११ पासून, इंडोनेशियन एरोस्पेसने औद्योगिक सहकार्याद्वारे इंडोनेशियातील बांडुंग येथील त्यांच्या कारखान्यां मध्ये ही विमाने तयार केली आहेत. २०२१मध्ये टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टम्सने भारतीय वायुसेनेसाठी ४० विमाने भारतातील गुजरातमधील वडोदरा येथे परवाना-निर्मित करण्याचा करार केला गेला. . यांशिवाय येथे भारतीय आरमार आणि भारतीय तटरक्षक दलांसाठी सागरी गस्त घालण्यासाठी आणखी १२ विमाने तयार केली गेली.
सैनिकी वाहतूकी शिवाय सी-२९५चा वापर पॅराशूटधारी सैनिक आणि सामान उतरवणे, इलेक्ट्रॉनिक संदेशवहन (ELINT), रुग्णउचलणी (MEDEVAC) आणि सागरी गस्त यांसाठीही होतो. विमानाला विविध भूमिका पार पाडायला झटपट तयार करण्यासाठी उपकरणे जलदगतीने लावता आणि काढता येतात. या विमानाला नागरी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांकडून विशेष मागणी नव्हती तरीही सरकारी आणि लष्करी संस्थांना हे विमान त्यांच्या प्रवासी वाहतूकी करता वापरता यावे यासाठी नागरी उड्डाण प्रमाणपत्र घेतले. मुख्यत्वे लष्करांतून वापरल्या जाणारे सी-२९५ २०१७मध्ये पहिल्यांदाच नागरी प्रवासी सेवेत दाखल झाले
एरबस कासा सी-२९५
या विषयावर तज्ञ बना.