एर माल्टा पीएलसी ही माल्टाची ध्वजवाहक विमानकंपनी होती. या कंपनीचे मुख्यालय लुका येथे असून मुख्य ठाणे माल्टा आंतरराष्ट्रीय विमानतळावर होते. ही कंपनी माल्टापासून युरोप, मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकेतील शहरांना विमानसेवा पुरवत असे. ३१ मार्च, २०२४ रोजी या कंपनीची विमाने आणि इतर मालमत्ता केएम एर माल्टा या कंपनीकडी हस्तांतरित करण्यात आले व केएम एर माल्टा ही माल्टा देशाची ध्वजवाहक कंपनी झाली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →एर माल्टा
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.