एर चायना

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

एर चायना

एर चायना ही चीनमधील विमानवाहतूक कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यालय बीजिंगमध्ये असून बहुतांश उड्डाणे बीजिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून होतात. १९८८ साली सुरू झालेल्या एर चायनाने २०१२ साली ७ कोटी २० लाख आंतरराष्ट्रीय तसेच अंतर्देशीय प्रवाशांची ने-आण केली. ही कंपनी चीनमधील बहुतांश विमानतळांना सेवा पुरवते तसेच मध्यपूर्व, पश्चिम युरोप तसेच उत्तर अमेरिका येथे बीजिंगपासून आणि आशिया, ऑस्ट्रेलिया आणि काही युरोपीय शहरांना चेंगडू, चॉंगचिंग, दालियान, हंग्झू, कुन्मिंग आणि शियामेन येथून सेवा पुरवते.

चीनची माजी ध्वजवाहक विमान कंपनी सीएएसीचे सहा विमान कंपन्यांमध्ये विभाजन झाल्यानंतर १९८८ मध्ये एर चायनाची स्थापना झाली. या सहांपैकी काही उपकंपन्या पुन्हा एर चायनामध्ये विलीन झाल्या. एर चायना ही आता चीनमधील सर्वात मोठ्या विमान कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीची ५३.४६% मालकी सरकारी मालकीच्या चायना नॅशनल एव्हिएशन होल्डिंग कडे आहे.

एर चायनाची मुख्य केंद्रे (हब) बीजिंग आणि चेंगडू येथे आहेत. २०१७ मध्ये, या विमान कंपनीने १० कोटी २० लाख देशांंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांची वाहतूक केली, ज्याचा सरासरी भार घटक ८१% होता. ही विमान कंपनी २००७ मध्ये स्टार अलायन्समध्ये सामील झाली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →