एर कॅनडा (Air Canada) ही कॅनडा देशाची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. १९३६ साली ट्रान्स कॅनडा एरलाइन्स ह्या नावाने स्थापन झालेली एर कॅनडा ही सध्या जगातील सर्वात जुन्या व प्रमुख विमानकंपन्यांपैकी एक आहे. स्टार अलायन्स समूहाचा संस्थापक सदस्य असलेली एर कॅनडा सध्या विमानांच्या संख्येच्या दृष्टीने जगातील ९व्या क्रमांकाची मोठी विमानकंपनी आहे. एर कॅनडाचे मुख्यालय मॉंत्रियाल शहरामध्ये असून टोरॉंटोच्या मिसिसागा उपनगरामध्ये स्थित असलेल्या टोरॉंटो पीयर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रमुख वाहतूकतळ आहे.
२०१३ साली एर कॅनडाला उत्तर अमेरिका खंडामधील सर्वोत्तम विमानकंपनी हा पुरस्कार मिळाला होता. एर कॅनडा एक्सप्रेस, एर कॅनडा रूज व एर कॅनडा कार्गो ह्या एर कॅनडाच्या उपकंपन्या आहेत. २००३ साली एर कॅनडाला आर्थिक परिस्थिती नाजूक झाल्यामुळे दिवाळखोरी जाहीर करावी लागली होती.
एर कॅनडा
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.