एमी वाइनहाऊस

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

एमी जेड वाइनहाउस (१४ सप्टेंबर, १९८३ - २३ जुलै, २०११) ही एक इंग्लिश गायिका आणि गीतकार होती. ही आपल्या अर्थपूर्ण कॉन्ट्राल्टो गायन आणि सोल, रिदम आणि ब्लूज, रेगे आणि जॅझसह संगीत शैलींच्या उत्कृष्ट मिश्रणासाठी ओळखली जाते.

वाइनहाऊसने आयुष्यभर मादक द्रव्यांचे सेवन, मानसिक आजार आणि व्यसन यांच्याशी संघर्ष केला. २३ जुलै, २०११ रोजी, वयाच्या २७व्या वर्षी, लंडनमधील तिच्या कॅम्डेन स्क्वेर येथील घरी, दारूची विषबाधा होउन तिचा मृत्यू झाला. तिच्या भावाला वाटते की यात बुलिमियाचा देखील वाटा होता. व्हीएच१ ने तिला संगीतातील १०० महान महिलांच्या यादीत वाइनहाउसला २६वा क्रमांक दिला आहे. सॅम टेलर-जॉन्सन दिग्दर्शित, बॅक टू ब्लॅक या २०२४मधील चरित्रपटात तिचे जीवन आणि कारकीर्द दाखविण्यात आले आहे..

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →