एकनाथ शिंदे

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

एकनाथ शिंदे

एकनाथ संभाजी शिंदे (९ फेब्रुवारी १९६४ - हयात) हे एक भारतीय राजकारणी आणि महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आहेत. शिंदे हे महाराष्ट्राचे पूर्व मुख्यमंत्री देखील आहेत. २०१५ ते २०१९ पर्यंत एकनाथ शिंदे हे सार्वजनिक बांधकाम खात्याचे कॅबिनेट मंत्री होते. ठाण्यातील कोपरी-पांचपाखाडी विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार आहेत. २००४, २००९, २०१४ आणि २०१९ असे सलग चार वेळा ते महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून गेले आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या प्रभावामुळे ते १९८० च्या दशकात शिवसेनेत दाखल झाले होते. जून २०२२ मध्ये त्यांनी महविकास आघाडीचे सरकार असलेल्या शिवसेनेतील ४० आमदारांना सोबत घेऊन आपला वेगळा गट स्थापन केला असून सध्या ते या गटाचे प्रमुख आहेत. भारतीय जनता पक्षाच्या समर्थनाने शिंदेंनी शपथ घेतली. या सरकारमध्ये शिंदे हे मुख्यमंत्री होते, तर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री होते.



केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालानुसार शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह तात्पुरत्या स्वरुपात त्यांच्या गटाला दिले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →