एकनाथ पवार हे एक भारतीय कवी, साहित्यिक, विचारवंत व चित्रपट गीतकार आहेत. संविधानिक आणि मानवी मूल्यांचे प्रखर पुरस्कर्ते असून सामाजिक , शैक्षणिक व पर्यावरण चळवळीतील एक नामवंत व्यक्तिमत्त्व आहे. श्यामची शाळा या मराठी चित्रपटात त्यांनी गीते लिहीली. याशिवाय 'क्लीन ग्रीन' , 'शिवार माझंं जलयुक्त' या लघुपटांत देखील त्यांनी रचलेली गाणी आहेत.
त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथराव , तर आईचे नाव भाग्यरथी असे आहे. त्यांनी ग्रामीण जीवनाचे दुःख , मानवीय मूल्यांचा प्रखर जागर, वंचितांच्या वेेेेदना याबरोबरच शेेेतकऱ्यांचे प्रश्न यांवर लिखाण केले आहे. त्यांच्या अनेक रचना आकाशवाणीवर प्रसारित झालेल्या आहेत. वृत्तपत्रातून विपुल लेेखनही केले आहे. 'क्लीन ग्रीन' या लघूपटालाही पवारांची सुमधूर गाणी लाभलेली असून यात ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे यांनी भूमिका साकारली. श्यामची शाळा या टॅक्स फ्री चित्रपटात अरुण नलावडे, विजय पाटकर , मिलिंद शिंदे, अभिनेत्री निशा परूळेकर यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.
एकनाथ पवार
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.