वसंत विचारधारा (वसंतवाद)

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

वसंतविचारधारा (वसंतवाद) ही महानायक वसंतराव नाईक यांनी अंगीकारलेल्या विशिष्ट मूल्याधारित जीवनशैलीला व सामाजिक आणि राजकीय चळवळींतील तत्त्वप्रणालीला उद्देशून प्रचलित झालेली एक स्थूल संज्ञा आहे. यामध्ये मुख्यतः विकेंद्रीकरण , स्वावलंबन , सर्वसमावेशकता , सहिष्णुता , कृषीनिष्ठा , दूरदृष्टी या तत्त्वाचा मुख्यतः समावेश होतो. वसंतवाद हे सामाजिक न्यायाचे प्रकर्षाने समर्थन करणारे आहे. वसंतविचारधाराचे अभ्यासक तथा 'थेट शेतकऱ्यांच्या बांधावर मोहीमेचे' प्रवर्तक, विचारवंत एकनाथराव पवार यांच्या मते , "वसंत विचारधारेचे मुलतत्वे खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक,विकेंद्रित आणि दूरदर्शी असून कोणत्याही विशिष्ट जात्यांधता किंवा धर्मांधता याला कुठेही स्पर्शत नाही. त्यामुळे वसंतविचारधारेचा केंद्र बिंदू हा 'माणूस' राहिला आहे. वसंतराव नाईकांचे जीवनमूल्ये, दूरगामी सर्जनशील विचार आणि विकासाभिमुख तत्वांचा परिपाक म्हणजे वसंतविचारधारा होय." वसंतविचारधारा यालाच 'नाईक विचारधारा' , नाईक थॉटस्' (V. P. Naik Thoughts) असेही म्हटल्या जाते. वसंतविचारधारा अर्थात वसंतवादाचा (Vasantism) विकासात्मक सामाजिकरणाच्या दृष्टीने अभ्यास होणे तितकेच गरजेचे आहे. पहिले वसंतवादी साहित्य संमेलन नागपूर येथे संपन्न झाले.तिसऱ्या वसंतवादी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद प्रसिद्ध लेखक आणि विचारवंत प्रा. जयसिंग जाधव यांनी भूषविले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →