ऊर्जित पटेल

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

ऊर्जित पटेल

ऊर्जित पटेल (२८ ऑक्टोबर १९६३-हयात) हे भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर होते. २० ऑगस्ट २०१६रोजी त्यांची या पदावर नेमणूक झाली होती. त्यांनी रघुराम राजन यांच्याकडून पदभार स्वीकारला होता. रघुराम राजन यांच्या पदाच्या कालावधीची मुदत ०४ सप्टेंबर २०१६ला संपली. ऊर्जित पटेल यांनी दि. ०६/०९/२०१६ रोजी प्रत्यक्षात रिझर्व बँकेच्या गव्हर्नरचा पदभार घेतला,(पूर्वलक्षी प्रभावाने दि. ०४/०९/२०१६ पासून), कारण दि. ४ सप्टेंबर रोजी रविवार होता व सोमवारी दि. ५ सप्टेंबरला गणेश चतुर्थीची कार्यालयीन सुटी होती. सोमवारी संध्याकाळी १०/१२/२०१८ रोजी त्यांनी राजीनामा दिला. त्यांच्या नंतर शक्तिकांत दास यांची रिझव्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून नेमणूक झाली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →