भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर

भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर हे भारताच्या मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि तिच्या केंद्रीय संचालक मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. वेतनश्रेणीतील क्रमवारी १८ नुसार, संकेतानुसार आरबीआयच्या गव्हर्नरचा दर्जा भारताच्या कॅबिनेट सेक्रेटरीच्या (मंत्रिमंडळ-सचिव) समतुल्य मानला जातो. भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे जारी केलेल्या भारतीय रुपयाच्या चलनी नोटांवर गव्हर्नरची स्वाक्षरी असते. १९३५ मध्ये स्थापना झाल्यापासून, आरबीआयचे नेतृत्व एकूण सव्वीस गव्हर्नरनी केले आहे. गव्हर्नर हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार) 'अजित डोवाल' यांच्या अध्यक्षतेखालील स्ट्रॅटेजिक पॉलिसी ग्रुपचे सदस्य असतात. हा राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय (नॅशनल सिक्युरिटी कौन्सिल सेक्रेटरियट) चा एक अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे.

ऑस्ट्रेलियन बँकर सर ऑस्बॉर्न स्मिथ हे या पदाचे पहिले मानकरी होते, तर सर सी. डी. देशमुख हे पहिले भारतीय गव्हर्नर होते. सर बेनेगल रामा राव हे सर्वात जास्त काळ, तब्बल सात वर्षांपेक्षा अधिक काळ या पदावर राहिलेले गव्हर्नर आहेत, तर अमिताभ घोष यांचा २० दिवसांचा कार्यकाळ हा सर्वात लहान कार्यकाळ आहे. बँकेचे पंधरावे गव्हर्नर मनमोहन सिंग हे नंतर भारताचे तेरावे पंतप्रधान झाले. संजय मल्होत्रा हे ११ डिसेंबर २०२४ पासून भारतीय रिझर्व्ह बँकेचे चोविसावे गव्हर्नर आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →