उरण ईश्वरपूर हे एक सांगली जिल्ह्यातील एक प्रमुख शहर असून, उरण ईश्वरपूर नगरपरिषदेची स्थापना दि. १६-११-१८५३ रोजी झालेली आहे. सन २००१ चे जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या ५८३३० इतकी आहे. उरण ईश्वरपूर नगरपालिका ही "ब" वर्ग नगरपालिका आहे. उरण ईश्वरपूर शहराचे क्षेत्र ४०४२ हेक्टर इतके आहे.
नरपालिका हद्दीत एकूण २६ वार्ड असून त्यामधून २६ नगरसेवक निवडून आलेले आहेत. तसेच नगरपालिकेत ३ नामनिर्देशित सदस्य आहेत. शहराचे पश्चिम हद्दीपासून पुणे बेंगलोर हा राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ हा सर्वसाधारणपणे २.५ किलोमीटर असून, पेठ-सांगली राज्य मार्ग क्र. १३८ हा शहरातून जातो.
शहरातील नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळणेसाठी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे. शहरात पाण्याच्या अनुक्रमे १) ७ लाख २) ७.५ लाख ३) ७.५ लाख लिटर्स क्षमता असलेल्या पाण्याच्या टाक्या असून सदर टाक्यांना ११ किलोमीतर अंतरावरून कृष्णा नदीतून दोन टप्प्यातून पाणी पुरविले जाते. उरण ईश्वरपूर नगरपरिषद ही वाटर मीटरद्वारे पाणीपट्टी आकारणी करणारी राज्यातील कदाचित एकमेव नगरपरिषद आहे.या गावापासून १० कि.मी अंतरावर नरसिंगपूर आहे.उरण ईश्वरपूर शहरामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयासारखी काही नामांकित महाविद्यालये आहेत त्यामध्ये के.आर.पी.कन्या,मालती कन्या तसेच आर.आय.टी.महाविद्यालयासारख्या अभियांत्रिकी महाविद्यालयांचा ही समावेश होतो. उरण ईश्वरपूर हे निमग्रामीन असे शहर आहे.या शहराचा मुख्य भाग उरण आहे तेथूनच खऱ्याअर्थाने शहराचा विस्तार झाल्याचा पहावयास मिळतो.म्हणूनच या शहराच्या आदि उरण हे नाव लावले जाते उरण-इस्लामपूर असे म्हंटले जाते.या उरण भागामध्ये शंकराचे मोठे मंदिर आहे.तेथे दरवर्षी शंभूआप्पाच्या नावाने आठ दिवस मोठया प्रमाणात उरूस भरतो.उरण ईश्वरपूर शहराच्या बाजूला राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना व त्या लगत मोठे राम मंदिर आहे.मंदिराच्या लगत राजारामबापू पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय आहे.
उरण (इस्लामपूर)
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.