उदयपूर

यामागील विज्ञान आणि इतिहास.

उदयपूर

उदयपूर हे भारत देशाच्या राजस्थान राज्यामधील उदयपूर जिल्ह्याचे मुख्यालय व एक ऐतिहासिक शहर आहे. सरोवरांचे शहर ह्या टोपणनावाने प्रसिद्ध असलेले उदयपूर राजस्थानच्या मेवाड प्रांताच्या राजधानीचे शहर होते. उदयपूरची स्थापना महाराणा दुसरे उदय सिंह ह्यांनी १५५९ साली केली व मेवाडची राजधानी चित्तोडगढहून उदयपूरला हलवली. १८१८ पर्यंत मेवाडची राजधानी राहिलेले उदयपूर ब्रिटिश राजवटीमध्ये राजपुताना एजन्सीचा भाग होते. उदयपूर जयपूरच्या ४०३ किमी नैऋत्येस तर अहमदाबादच्या २५० किमी ईशान्येस स्थित आहे.

उदयपूर हे राजस्थानमधील एक अत्यंत लोकप्रिय पर्यटनस्थळ असून पर्यटनावर येथील अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. येथील पिछोला सरोवरावर बांधण्यात आलेले सिटी पॅलेस, सरोवरातील अनेक कृत्रीम बेटे (लेक पॅलेस) इत्यादींसाठी येथे जगभरातून पर्यटक येतात.

मुंबई व दिल्लीदरम्यान धावणारा राष्ट्रीय महामार्ग ८ उदयपूरमधूनच जातो. उदयपूर विमानतळ शहराच्या २२ किमी पूर्वेस स्थित आहे. उदयपूर सिटी रेल्वे स्थानक येथील प्रमुख रेल्वे स्थानक असून येथून दिल्ली, कोलकाता, मुंबई इत्यादी प्रमुख शहरांसाठी थेट गाड्या सुटतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →