इस्लामिक स्टेट्स ऑफ इराक अँड लेव्हंट (अरबी: الدولة الإسلامية في العراق والشام) (इसील), किंवा इस्लामिक स्टेट्स ऑफ इराक अँड सीरिया (संक्षेप: ISIS, आय.एस.आय.एस., आयसिस किंवा इसिस) ही एक आंतरराष्ट्रीय अतिरेकी संघटना व स्वयंघोषित खिलाफत आहे. इस्लाम धर्मातील सुन्नी पंथाच्या वहाबी/सलाफी विचारांच्या कट्टर अतिरेक्यांद्वारे चालवली जात असलेली ही संघटना प्रामुख्याने पश्चिम आशियातील इराक व सीरिया ह्या देशांमध्ये कार्यरत आहे.
सध्या इराक व सीरिया देशांतील मोठ्या भूभागावर आयसिसचे नियंत्रण आहे. आयसिसची स्थापना २००४ साली झाली व तिने अल कायदामध्ये प्रवेश केला. २०१४ साली आयसिस अल कायदामधून वेगळी झाली व अबू बक्र अल-बगदादी ह्या आयसिसच्या म्होरक्याने इस्लामिक खिलाफतीची घोषणा केली व स्वतःला खलिफा जाहीर केले. २०१४ साली आयसिसने इराकच्या वायव्य भागातील मोठा भूभाग काबीज केला व मोसुल हे इराकमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर ताब्यात घेतले.
आयसिस हा एक अत्यंत हिंसक गट असून सुन्नी वगळता इतर मुस्लिम पंथांच्या लोकांचे शिरकाण, महिलांचे शोषण, अपहरण, बलात्कार, इत्यादी अनेक गुन्हे आयसिसद्वारे करण्यात येत आहेत. आयसिसचे अतिरेकी जगभर कार्यरत असून भारत, अमेरिका, रशिया, युरोपियन संघ इत्यादी प्रमुख देशांनी आयसिसला अतिरेकी संघटना म्हणून घोषित केले आहे. आयसिसचे अतिरेकी जगभर कार्यरत असून त्यांच्याद्वारे करण्यात येत असणारे हल्ले हा जगातील देशांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. मध्य पूर्वेसोबतच युरोप व उत्तर आफ्रिकेमध्ये देखील आयसिसचे अतिरेकी कार्यरत आहेत. बोको हराम, तालिबान इत्यादी इतर मुस्लिम अतिरेकी संघटनांनी आयसिसला पाठिंबा दर्शवला आहे.
२०१५ सालच्या नोव्हेंबरमध्ये आयसिसने पॅरिस महानगरामध्ये घडवून आणलेल्या हल्ल्यांमध्ये १२९ लोक मृत्युमुखी पडले.
इस्लामिक स्टेट्स
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?