* सूचना: हे पान अर्धसुरक्षित आहे. फक्त प्रवेश केलेले सदस्य याच्यात बदल करू शकतात.
ओसामा बिन मोहम्मद बिन अवाद बिन लादेन ( अरबी: أسامة بن محمد بن عوض بن لادن ; रोमन लिपी: Osama bin Mohammed bin Awad bin Laden) (१० मार्च, इ.स. १९५७ - २ मे, इ.स. २०११) हा सप्टेंबर ११ च्या अमेरिकेवरील हल्ल्यांस, तसेच जगभर अन्यत्र नरसंहारास जबाबदर असलेल्या अल कायदा या इस्लामी जिहादी संघटनेचा संस्थापक व प्रमुख होता. वांशिकतेने येमेनी असलेला ओसामा बिन लादेन सौदी अरेबियातल्या प्रतिष्ठित बिन लादेन घराण्यात जन्मला होता.
त्याला पडकण्यासाठी अडीच कोटी अमेरिकन डॉलरचे बक्षीसही अमेरिकेने जाहीर केले होते. पुढे १३ जुलै २००७ रोजी या बक्षिसाची रक्कम पाच कोटी डॉलर इतकी वाढवण्यात आली होती. भारतीय प्रमाणवेळेनुसार, १ मे २०११ च्या मध्यरात्री पाकिस्तानात देशाची राजधानी इस्लामाबादपासून केवळ ६५ किमी अंतरावरील अबोटाबादमध्ये 34°10′9.67″N 73°14′33.60″E अमेरिकी नेव्ही सील कमांडोंनी या क्रूरकर्म्याला मस्तकात आणि छातीवर बंदुकींतून गोळ्या झाडून ठार मारले. लादेनसाठीच्या या कारवाईला ‘जेरोनिमो’ असे सांकेतिक नाव ठेवण्यात आले होते.
ओसामा बिन लादेन
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.