इराक हा अतिप्राचीन लिखित इतिहास असलेला मध्यपूर्वेतील एक प्रजासत्ताक देश आहे. इराकच्या पूर्वेला इराण (कुर्दिस्तान प्रदेश), दक्षिणेला सौदी अरेबिया, आग्नेयेला कुवेत, पश्चिमेला जॉर्डन, वायव्येला सीरिया व उत्तरेला तुर्कस्तान हे देश आहेत. बगदाद ही इराकची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
१९७९ ते २००३ सालादरम्यान इराक देशाचे शासन सद्दाम हुसेन ह्या हुकुमशहाच्या ताब्यात होते. २००३ साली अमेरिकेने इराकवर लष्करी कारवाई करून सद्दामची राजवट संपुष्टात आणली. मोहम्मद शिया अल सुदानी हे इराकचे सध्याचे पंतप्रधान आहेत.
इराकचे क्षेत्रफळ ४,३८,३१७ वर्ग किलोमीटर एवढे असून लोकसंख्या ३,१४,३७,००० एवढी आहे. अरबी व कुर्दिश ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. तैग्रिस नदी आणि युफ्रेटिस नदी या दोन नद्यांमधील प्रदेश म्हणून पूर्वी या देशाला 'मेसोपोटेमिया' असे म्हणत.
इराकचे अधिकृत चलन दिनार असून या देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था खनिज तेलावर अवलंबून आहे. बार्ली हे इराकचे प्रमुख धान्य आहे. खजुराची निर्यात करण्यात इराकचा जगात पहिला क्रमांक लागतो.
इराक
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!